चीनमध्ये लॉकडाऊन: चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार ; रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । आता कुठे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली होती. मात्र पुन्हा चीनमध्ये कोरोनाने डोक वर काढले आहे. कोरोनाची परिस्थिती निवळत असताना चीनमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण अधिक सापडत आहे. चीनच्या चांगचुन या 90 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. म्हणून चीनमध्ये कोरोनाची दहशत सूरू झाली आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्येच आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात कोरोनाचे जाळे पसरले. या भयंकर विषाणूमुळे अनेकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. यातच नव्या विषाणूमुळे डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे.

चीनमध्ये 9 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुन शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या ठिकाणी नव्या विषाणूचा प्रसार पाहता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला गेला आहे. चीनच्या वुहान शहरात 2019 मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर या प्राणघातक विषाणूचे संपूर्ण जगभर जाळे पसरले होते.

दरम्यान, कोरोनामुळे मोठ्या संख्येत लोकांनी प्राण गमावले. अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली नसताना चीनमधील नव्या विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचे एकूण 397 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 98 चांगचुनच्या आसपास असलेल्या जिलिन प्रांतात सापडली आहेत. चांगचुंग शहरात फक्त दोन प्रकरणे आढळून आल्याचे वृत्त समोर येत आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे सावट अजूनही कायम आहे. अनेक युरोपीय देश आणि अमेरिकेत अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. भारतातदेखील कोरोना परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. मात्र, मागील काही महिन्यांपासून देशातील रुग्णसंख्या कमी झाली असून, दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ज्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *