सीएनजी पीएनजी होणार 5 रुपयांनी स्वस्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च । राज्यातील पीएनजी वापरकर्त्या गृहिणींसह सीएनजी वाहन चालकांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळालेला आहे. सीएनजी पीएनजी निर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या नैसर्गिक वायूवरील मूल्य वर्धित करात थेट 13.50 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा अर्थ मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली आहे. त्यामुळे पीएनजी आणि सीएनजी वायूचे दर सुमारे 5 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर मुंबईत घरगुती पाईप गॅस अर्थात पीएनजीचे दर 39.50 रुपयांपर्यंत वाढलेले आहेत. गेल्या वर्षभरात पीएनजी दरात 29.50 रुपयांवरून 39.50 रुपयांपर्यंत म्हणजेच 35 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. परिणामी, अर्थ संकल्पातील या घोषणेमुळे पीएनजी दर 35 रुपयांपर्यंत कमी होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *