सोमय्यांनी शेअर केला ‘रिसॉर्ट’चा फोटो ; ‘आता अनिल परबांचा नंबर आलाय…’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च । चार राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारल्यानंतर महाराष्ट्रातही मविआ सरकार अस्थिर होत असल्याची चर्चा सुरू आहे. यंदा देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची ठरल्याने राज्यातही भाजपचं स्थान भक्कम होत असल्याचं चित्र तयार झालंय. सध्या राज्य सरकारचं अधिवेश अंतिम टप्प्यात आहे. याआधी फडणवीसांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून स्फोट केला. त्यासंदर्भात सरकारडून अद्याप स्पष्टीकरण आलेलं नाही. (Kirit Somaiya Alleges Anil Parab over corruption in RTO)

त्यातच आता किरीट सोमय्या पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. यंदा त्यांच्या टार्गेटवर परिहवन मंत्री अनिल परब आहेत. सोमय्यांनी याआधीही अनिल परब आणि त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांची नावं समोर आणली होती. बजरंग खरमाटे नावाचा आरटीओ अधिकारी परबांचा ‘वाझे’ आहे, असं सोमय्यांनी म्हटलं होतं. आता सोमय्यांनी आणखी एक ट्वीट करत महाविकास आघाडीतील चौथ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

सोमय्या यांनी रश्मी ठाकरे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचे कोकणात अनधित बंगले असल्याचा आरोप केला होता. यासोबत किनारपट्टी भागात अनिल परबांचे बंगले असल्याचं सांगितलं. याचे पुरावे त्यांनी दिले आहेत. सोमय्यांनी ट्वीट करत परबांच्या रिसॉर्टचा फोटो टाकला आहे.

कोकणातील बेनामी रिसॉर्ट, काळा पैसा आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणात अनिल परब यांच्याविरोधात केंद्र सरकारने तक्रार दाखल केल्याचं सोमय्यांनी सांगितलं. याची दापोली कोर्टात ३० मार्चला सुनावणी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *