महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च । Gold Silver Price Today : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होताना दिसत आहे. या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यवहारावर तर होतोच आहे. परंतु, भारतीय बाजारपेठेवरही या युद्धाचे पडसाद उमटताना दिसतायत. याच युद्धाचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या किंमतीतही सातत्याने अस्थिरता निर्माण झाली आहे. सोन्याचे दर आज 52 हजारांवर पोहोचले आहेत. जाणून घ्या आजचे ताजे दर..
मॅक्स कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.58 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचे दर आज 52,800 रूपये झाले आहेत. तर, चांदीचे दर 0.71 टक्क्यांनी वाढून 69,400 रूपये प्रति किलो झाले आहेत.
स्पॉट गोल्ड 0139 GMT नुसार 0.8 टक्क्यांनी घसरून $1,975.69 प्रति औंस होता, जे सत्राच्या सुरुवातीला 1 टक्क्यांनी घसरले होते. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.5 टक्क्यांनी घसरून $1,978.80 वर आले. तर, स्पॉट सिल्व्हरचा दर 0.9 टक्क्यांनी घसरून $25.49 प्रति औंस झाला, तर प्लॅटिनम 1.1 टक्क्यांनी घसरून $1,065.14 वर आला. पॅलेडियम 1.1 टक्क्यांनी घसरून $2,904.04 प्रति औंस झाला.
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.