Kashmir Tour : IRCTC ने काश्मीरसाठी आणलं शानदार टूर पॅकेज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १२ मार्च । काश्मीरला पृथ्वीचे स्वर्ग म्हटले जाते. काश्मीरचे सौंदर्य पाहणे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. कोरोना महामारीमुळे देशातील आणि जगभरातील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. आता देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये बरीच घट होताना दिसत आहे.

जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे. आता लोक घराबाहेर पडण्याचा विचार करत आहेत. यादरम्यान, तुम्हीही लवकरच काश्मीरला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आयआरसीटीसीच्या (IRCTC) एक्झोटिक काश्मीर (Exotic Kashmir) पॅकेज टूरचा आनंद घेऊ शकता. या टूर पॅकेजच्या काही खास वैशिष्ट्ये जाणून घ्या…

IRCTC Exotic Kashmir टूर पॅकेजची खास वैशिष्ट्ये-
– उन्हाळ्याच्या सुट्यांसाठी हे पॅकेज खास प्लॅन करण्यात आले आहे.
– एकूण 6 दिवस आणि 7 रात्री हे पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही रांची ते दिल्ली आणि नंतर दिल्ली ते श्रीनगर फ्लाइटने प्रवास कराल.
– पॅकेजमध्ये प्रवाशांना सकाळी नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळणार आहे.
– हा संपूर्ण प्रवास 26 मे 2022 रोजी सुरू होईल आणि 1 जून 2022 रोजी रांची येथे संपेल.
– पॅकेजमध्ये तुम्हाला इकॉनॉमी क्लासमध्ये रांची ते दिल्ली आणि दिल्ली ते श्रीनगर जाण्याची संधी मिळेल.
– तुम्हाला श्रीनगर आणि सोनमर्गमध्ये रात्रभर राहण्याची सुविधा मिळेल.
– तसेच हाऊसबोटमध्ये एक रात्र मुक्काम करण्याची सुविधाही मिळणार आहे.
– संपूर्ण पॅकेजमध्ये, तुम्हाला श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम इत्यादी ठिकाणांना भेट देता येईल.

द्यावे लागेल इतके शुल्क…
जर तुम्हाला आयआरसीटीसी एक्झोटिक काश्मीर (IRCTC Exotic Kashmir) टूर पॅकेजद्वारे काश्मीरला भेट द्यायची असेल, तर तुम्ही या प्रवासाला एकटे जात असाल तर तुम्हाला 49,800 रुपये मोजावे लागतील. तर दोन लोकांसाठी प्रत्येकी 33,950 रुपये मोजावे लागतील. तीन लोकांना प्रत्येकी 32,660 रुपये द्यावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *