Ukraine Crisis: रशियन सैन्यानं घेरल्यानंतर झेलेन्स्की यांचे उद्गार ; ‘किती तास उरलेत सांगता येणार नाही’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १२ मार्च । रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा १७ वा दिवस आहे. रशियानं युक्रेनची राजधानी कीव्ह आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना चहूबाजुंनी घेरलंय. युक्रेनवर संभाव्य हल्ला करण्यासाठी रशियनं सैनिक पुन्हा एकदा गोळा झाल्याचं राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलंय. पुढच्या काही तासांत महत्त्वाच्या आणि निर्णयाक घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

वोलोदिमीर झेलेन्स्की हे सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार आपल्या देशाची स्थिती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘युक्रेन आता एका महत्त्वाच्या रणनैतिक टप्प्यावर पोहचलंय. युक्रेनचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आमच्याकडे आता किती तास उरलेत हे सांगणं कठीण आहे. परंतु, आम्ही आमच्या देशाचं संरक्षण करू. आम्ही आमचं उद्दीष्ट आणि आमच्या विजयाकडे वाटचाल करत आहेत’, असं झेलेन्स्की यांनी आपल्या देशवासियांना संबोधित करताना म्हटलंय.

https://www.facebook.com/100007211555008/videos/482654886652700/

रशिया आणि युक्रेन युद्धानं तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केलाय. याच दरम्यान, अमेरिकेकडून क्रेमलिनच्या वरिष्ठ अधिकारी आणि रशियातील काही प्रसिद्ध व्यक्तींवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेकडून शुक्रवारी रशियन अब्जाधीश व्हिक्टर वेक्सेलबर्ग, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या प्रवक्त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य आणि रशियन खासदारांवर निर्बंध जाहीर केले आहेत.

शुक्रवारी राजधानी कीव्हनजिक रशियन सैनिकांचा मोठा ताफा दिसून आला. एका अमेरिकन कंपनीच्या सॅटेलाईन फोटोंमधून समोर आलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याच्या मोठ्या तुकडीला कीव्हवर हल्ला करण्यासाठी तैनात करण्यात आलंय. हा रशियन सैनिकांचा ताफा शेवटी कीव्हच्या उत्तर – पश्चिम भागातील एन्टोनोव्ह विमानतळाजवळ दिसून आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *