भारतीय लष्कराचे हेलीकॉप्टर कोसळले – पायलट ठार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १२ मार्च । जम्मु काश्मीरच्या गुरेज भागात काल दुपारी भारतीय सेनेचे चिता हेलीकॉप्टर अपघातग्रस्त झाले असून त्यात वैमानिकाचा मृत्यू झाला तर सहवैमानिक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. सहवैमानिकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविले गेले आहे. रेस्क्यू ऑपरेशनची सुरवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आघाडी पोस्टवरील एका जखमी सैनिकाला आणण्यासाठी हे हेलीकॉप्टर निघाले होते. गुरेजच्या तुतैल भागात असताना या हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संबंध तुटला. त्याचवेळी हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्याचे लक्षात आले आणि हवाई दल तसेच सेनेने त्वरित रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. पण वैमानिकाचा मृत्यू झाला होता असे दिसून आले.

चिता ही सिंगल इंजिन हेलीकॉप्टर मुव्हिंग मॅप डिस्प्ले, ग्राउंड प्रोक्सीमिटी वॉर्निंग सिस्टीम तसेच वेदर रडार अश्या सुविधांनी युक्त नाहीत. त्यात ऑटो पायलट सुविधा नाही. त्यामुळे खराब हवामानात पायलटना ही हेलिकॉप्टर चालविण्यात अनेकदा अडचणी येतात. भारतीय सेनेकडे २०० चित्ता हेलीकॉप्टर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *