महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन : मुंबई ; कोरोना प्रादुर्भावामुळे बिघडलेले आर्थिक गणित पाहता बॅंकांनी कर्जफेडीच्या हप्त्यांची वसुली तीन महिने पुढे ढकलावी. ही वसुली नंतर व्याजासह करावी, अशी सूचना रिझर्व्ह बॅंकेने केली होती. त्यानुसार पुढील तीन महिने कर्जाचे हप्ते वसूल करावेत किंवा नाही, अशी विचारणा बहुतेक खासगी बॅंका ग्राहकांना करणार आहेत. एचडीएफसीही एक-दोन दिवसांत अशी विचारणा करेल; त्यानुसार ग्राहकांना पर्याय निवडावा लागेल,