महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन : मुंबई ; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना ग्रीन कार्ड मिळवण्याची इच्छा असते. मात्र एका रिपोर्टनुसार रोजगारावर आधारित अमेरिकन नागरिकत्वाची मागणी करणाऱ्यांची संख्या 2030 पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीयांना ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अनेक दशकं वाट पाहावी लागू शकते.
ग्रीन कार्ड अमेरिकन नागरिक नसणाऱ्यांना कायमस्वरूपी अमेरिकेत राहण्यास व काम करण्यासाठी आवश्यक असते. सध्याच्या इमिग्रेशन प्रणालीमध्ये प्रत्येक देशाच्या नागरिकांसाठी 7 टक्के कोटा आहे. अशा परिस्थितीत एच-1बी व्हिसावर भारतात येणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिसच्या रिपोर्टनुसार, काँग्रेसने प्रत्येक देशाचा कोटा कमी केल्यास काही प्रमाणात वेळेत बदल होईल.
जवळपास 1 मिलियन परदेशी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य ग्रीन कार्डच्या प्रतिक्षेत आहेत. रिपोर्टनुसार, 2030 पर्यंत रोजगारावर आधारित बॅकलॉक दुप्पट होण्याची शक्यता आहे.
नवीन विधेयकामध्ये ईबी1, ईबी2 आणि ईबी3 बॅकलॉक्समध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे. याद्वारे सर्व देशातील नागरिकांना ग्रीन कार्डसाठी समान वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे