महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन : मुंबई ; एकीकडे कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यातील सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. पण तरीदेखील मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मंगळवारी 24 तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 72 कोरोनाव्हायरसचे नवे रुग्ण आढळले होते. त्यात अवघ्या 12 तासांमध्ये आणखी 16 रुग्णांची वाढ झाली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा आज पहाटे वाढ झाली आहे. मुंबईतून 16 तर पुण्यातून कोरोनाचे 2 नवे रुग्ण समोर आले आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची 320 वर पोहोचली आहे. एकीकडे मुंबईकरांची चिंता वाढल्याचं समोर आलं आहे. कारण अवघ्या 12 तासांमध्ये मुंबईमध्ये 16 नवे रुग्ण समोर आले आहेत.
एकट्या मुंबई आणि परिसरात (MMR)67 आढळले होते. एका दिवसातली आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. यातले खुद्द मुंबईतले 59 रुग्ण आहेत. तर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वाशी, विरार इथे प्रत्येकी 2 रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा 72 ने वाढला होता.
मुंबईमध्ये रात्री आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एका 75 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होता. काल रात्री त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टकरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आता राज्यात मृतांचा आकडा 12वर गेला आहे. रात्री हा आकडा 10वर होता पण काल पालघरमध्येही एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.