व्याजदर कपातीनंतरही ‘पीएफ’च सर्वोत्तम ! गुंतवणूक तज्ज्ञ मत ; जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याज दर ८.१ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ४४ वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२०-२१ मध्ये हा दर ८.५ टक्के देण्यात आला होता. यापूर्वी १९७७-७८ मध्ये ईपीएफ (EPF) वर सर्वात कमी ८ टक्के व्याजदर होता. ईपीएफओचे देशात सुमारे ६ कोटी सदस्य आहेत, ज्यांच्यावर ईपीएफओच्या या निर्णयाचा परिणाम होणार आहे. आता पैसे कुठे गुंतवायचे, कुठे जास्त व्याज मिळेल, असा विचार लोक करत आहेत. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय कोणता आहे, यावर कर तज्ज्ञांनी त्यांची मते मांडली आहेत.

तज्ज्ञ काय म्हणतात?
कर तज्ज्ञ बलवंत जैन यांच्या मते, सरकार पीएफची रक्कम जिथे गुंतवते, तिथून मिळणारा परतावा कमी झाला आहे. अशा स्थितीत त्यावरील व्याज कमी करणे ही सरकारची मजबुरी आहे, पण पीएफचा व्याजदर अजूनही महागाई दरापेक्षा जास्त आहे आणि इतर ठेव योजनांच्या तुलनेत अधिक आकर्षक आहे. अशा परिस्थितीत तुमचे भांडवल गुंतवण्यासाठी पीएफ ही सर्वोत्तम योजना आहे. म्हणजेच व्याजदर कमी झाला आहे, असा विचार करून स्वतःला पीएफपासून दूर करू नका, कारण येथेच तुम्हाला सर्वोत्तम परतावा मिळत आहे.

कोणत्या बचत योजनेत किती व्याज मिळते ते पाहूया.

योजनेचे नाव                             परतावा                         गुंतवणूक कालावधी
EPF                                         ८.१ टक्के                                    ५ वर्षे
सुकन्या समृद्धी योजना              ७.६ टक्के                                   १५ वर्षे
ज्येष्ठ नागरिक बचत योजना    ७.४ टक्के                                    ५ वर्षे
पीपीएफ (PPF)                         ७.१ टक्के                                  १५ वर्षे
किसान विकास पत्र                   ६.९ टक्के                                 १२४ महिने
एनएससी                                  ६.८ टक्के                                     ५ वर्षे
पोस्ट ऑफिस मासिक योजना    ६.६ टक्के                                    ५ वर्षे
एफडी                                        ३.५-६.८ टक्के                      ७ दिवस ते १० वर्षे
राष्ट्रीय पेन्शन योजना               ५-८ टक्के                       वयाच्या ६० वर्षापर्यंत गुंतवणूक

आता जे व्याजदर निश्चित केले आहेत, त्यावर अंतिम निर्णय घेणे अजून बाकी आहे. आता सीबीटी (CBT) च्या अलीकडील निर्णयानंतर, २०२१-२२ साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदराची माहिती मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवली जाईल. मार्च २०२० मध्ये, ईपीएफओने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर २०१८-१९ मधील ८.६५ टक्क्यांवरून २०१९-२० साठी सात वर्षांत सर्वात कमी ८.५ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *