महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च । मिठाचे पाणी (Salt Water ) आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, मिठाचे पाणी मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. पोटाच्या विकारांपासून ते त्वचेच्या समस्या दूर करण्याचा हा एक प्रभावी उपाय आहे. आज आपण मिठाच्या (Salt Water Benefits) पाण्याचे फायदे जाणून घेऊया.
घसा खवखवणे
‘झी न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार, मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशातील बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे घसादुखीची त्रास खूप कमी होतो. तसेच घशातील पेशींची जळजळ कमी होते. घशातील संसर्ग किंवा घसा खवखवताना मिठाच्या पाण्याचा वापर केल्याने आराम मिळतो. कारण समुद्री मीठामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशातील संक्रमित पेशींची सूज कमी होण्यास मदत होते.
त्वचेसाठी
त्वचेच्या समस्या (skin Problems) दूर करण्यासाठी मीठ देखील एक प्रभावी उपाय आहे. यामध्ये असलेले सल्फर घटक त्वचेचा पृष्ठभाग स्वच्छ आणि मऊ ठेवण्यास मदत करतात. त्वचेच्या विविध समस्या कमी करण्यासाठी मिठाचे पाणी प्या. मिठामुळे चांगले पचनही होते.
तोंडाची दुर्गंधी
खारट पाणी माउथवॉश म्हणून देखील वापरले जाऊ शकते. याचा नियमित वापर केल्याने तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात. हे हिरड्यांमधील सूज, श्वासाची दुर्गंधी आणि दातांमधील कीड कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा समुद्री मीठ मिसळा आणि सुमारे 1-2 मिनिटे तोंडात ठेवा. त्यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होईल.
पायांसाठी
पायाला दुर्गंधी येण्याच्या समस्येवरही खारट पाणी वापरता येते. यासाठी एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात 1-2 कप मीठ घाला. आता या पाण्यात पाय काही वेळ बुडवून ठेवा. 20 मिनिटांनंतर पाय सामान्य पाण्याने धुवा, दुर्गंधी नाहीशी होईल.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. )