MH 10th board Exam: यंदाची 10 वीची परीक्षा विद्यार्थ्यांना पेपरदरम्यान मिळणार या सुविधा; जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.14 मार्च । महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड हायर सेकेंडरी एजुकेशनतर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा (Maharashtra State Board 10th exam) राज्यात मंगळवारपासून म्हणजेच 15 मार्चपासून सुरु होणार आहे. यंदा दोन वर्षांनंतर बोर्डाची परीक्षा ऑफलाईन (Offline Board exams) पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्सुकता लागली आहे. तसंच यंदाची परीक्षा खास असणार आहे. वर्षभर ऑनलाईन क्लासेस केल्यानंतर विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन परीक्षा (Offline board exams) देण्याची संधी मिळणार आहे. म्हणूनच बोर्डाकडून यंदा विद्यार्थ्यांना पेपर देण्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून विशेष सुविधा (Special arrangements for 10th board students by exam board) देण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग जाणून घेऊ या याबद्दल.

यंदाच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16,39,172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 8,89,584 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. तर 7,49,478 इतक्या विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. राज्यभरातून पाच हजारपेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदाची दहावीची परीक्षा ही एकूण 75% टक्के अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. तसंच कोरोनमुळे यंदा परीक्षा नेहमीपेक्षा पंधरा ते वीस दिवस उशिरा घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार अधिक वेळ

यंदा पेपरदरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यात येणार आहे. 70 -100 मार्कच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना 30 मिनिटं अधिक देण्यात येणार आहेत. तर 40 – 60 मार्कांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटं अधिक देण्यात येणार आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली त्यामुळे ही सोय विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

आधी मिळणार प्रश्नपत्रिका

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रशपत्रिका लवकर समजावी आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना आकलन करता यावं यासाठी उत्तरपत्रिका देण्याच्या 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांनो, परीक्षेदरम्यान खाण्या-पिण्याकडे द्या लक्ष; असा ठेवा आहार

पुरवणी परीक्षा

जे विद्यार्थी परीक्षेत पास होऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून दहावीची पुरवणी परीक्षा ही साधारणतः जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये होणार असल्याचं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

बोर्डानं जारी केले हेल्पलाईन नंबर

संपूर्ण परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी बोर्डाकडून घेण्यात आली आहे. मात्र जर विद्यार्थ्यांना काही अडचणी येत असतील तर बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी विभागनिहाय हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *