पाकिस्तानची अवस्था बिकट : पाच दिवस पुरेल इतकाच डिझेलसाठा शिल्लक, कर्जही मिळेना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १५ मार्च । आर्थिक अव्यवस्था, कोरोना महामारी यांमुळे आधीच खिळखिळी झालेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता इंधनटंचाईच्या उंबरठ्यावर उभी आहे. रशिया आणि यूक्रेन युद्धाचे भयंकर पडसाद पाकिस्तानवर उमटले असून आता पाकिस्तानकडे पाच दिवस पुरेल इतका डीझेलसाठा शिल्लक आहे.

रशिया आणि यूक्रेनमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचे पडसाद इंधनांच्या दरावर पडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनतेलाच्या किमती वाढल्यामुळे पाकिस्तानात पेट्रोलियम उत्पादनांची टंचाई निर्माण झाली आहे. एक्सप्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी बँकांनीही तेल कंपन्यांना उच्च जोखमीच्या श्रेणीत टाकलं आहे आणि कर्ज देण्यास नकार दिला आहे.

डीझेलच्या कमतरतेमुळे आता पाकिस्तानात महागाईचा भडका उडणार आहे. पाकिस्तानची महागाई उपभोक्ता मूल्य सूचकांक (सीपीआय)ने मोजली जाते. आणि गेल्या 24 महिन्यात हा दर 13 टक्के इतका सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. त्यामुळे जवळपास सगळ्या वस्तुंच्या किमती वाढल्या आहेत. या संकटामुळे इम्रान खान यांचं सरकार आणखी खोलात गेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *