हक्क नाही मिळाला तर… ; IPLची बस फोडल्यानंतर मनसेचं स्पष्टीकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ मार्च । मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आयपीएलची बस फोडली आहे. खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईच्या व्यावसायिकांना न दिल्यानं मनसे आक्रमक झाली आहे. IPLमधील खेळाडूंसाठी आणलेली बस मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री फोडली असल्याची माहिती आहे. काल रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास ताज हॉटेलसमोर ही घटना घडली असल्याची माहिती आहे.

आयपीएल महाराष्ट्रामध्ये तर आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या बसेस दिल्लीतून का?
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी म्हटलं की, आम्ही गुंडगिरी केली तुम्ही म्हणता पण का केली ते ही जाणून घ्या. आयपीएल महाराष्ट्रामध्ये तर आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या बसेस दिल्लीतून का मागवताय. सरकार एका बाजूला म्हणत की आयपीएल महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे अर्थ चक्राला गती मिळेल मग महाराष्ट्राच्या वाहतूदारांना यातून वंचित का ठेवलं जात आहे, असा सवाल नाईकांनी केला आहे.

नाईक म्हणाले की, दिल्लीतील बसेस वर टॅक्स नाही म्हणून ते स्वस्त दरात बसेस उपलब्ध करुन देतात. आज महाराष्ट्र मध्ये प्रत्येक बसला 3 लाख रुपये टॅक्स द्यावा लागतो म्हणून दर जास्त असतात. यात सरकारने मध्यस्ती केली पाहिजे, पण ते होत नाही. म्हणून आमच्या हक्कासाठी तोडफोड केली आणि जर हक्क नाही मिळाला तर पुढेही तोडफोड करु, असा इशारा नाईकांनी दिला आहे.

मनसेच्या वाहतूक सेनेचा आक्रमक पवित्रा

आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळंच वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस काल रात्री फोडली आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यातील वाहतूक व्यवसाय हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्यांच्या घशात घालायचा प्रयत्न सुरू होता. आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करूनही काही बदल झाला नाही. त्यामुळे मनसेने हा दणका दिला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *