महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ;बीजिंग, : कोरोनामुळे सध्या जगभरात हाहाकार माजला आहे. तब्बल 180 देश कोरोनाचा सामना करत आहेत. अद्याप एकाही देशाला कोरोनावर यशस्वी लस शोधता आलेली नाही आहे. या सगळ्यात एक दिलासादायक बातमी आली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या पाच गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. हे उपचार कोणत्याही औषधाने नाही तर रक्ताने केले गेले आहेत. उपचारासाठी वारण्यात आलेले रक्त हे त्या रुग्णांचे होते ज्यांना यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. चीनमधील रुग्णालयात या उपचाराची चाचणी करण्यात आली. या उपचारातून निरोगी झालेल्या तीन रुग्णांना घरीही पाठवण्यात आले आहे.
या रूग्णांवर उपचार करणार्या डॉक्टरांचा असा विश्वास आहे, की वृद्ध रुग्णांच्या रक्ताने उपचार केल्यास कोरोना बरा होऊ शकतो. डेलीमेल वेबसाइटवर ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. 27 मार्च रोजी चीनच्या शेनझेन थर्ड पीपल्स हॉस्पिटलने उपचारांच्या या पद्धतीचा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सांगितले की, कोरोनाच्या रुग्णांच्या रक्ताने पाच रुग्णांवर उपचार करण्यात आले. या रुग्णांचे वय 36 ते 73 दरम्यान होते.