राजा शिवछत्रपती मराठी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ;मुंबई: कोरोनाचं संकट सध्या संपूर्ण जगावर थैमान घालत आहे. लॉकडाऊन असल्यामुळं मालिकांचं शूटिंगही थांबलं आहे. या कठीण काळात सर्वच वाहिन्यांवर मालिकांचं पुन:प्रक्षेपण सुरु झालं आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकांचे पुन्हा पुन्हा तेच एपिसोड दाखवण्यापेक्षा जुन्या मालिका पुन्हा दाखण्यात याव्या अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे.

प्रेक्षकांच्या मागणीचा विचार करता स्टार प्रवाहवरील राजा शिवछत्रपती आणि आंबटगोड या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्याच्या नकारात्मक वातावरणात या दोन्ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच नवी उभारी देतील. शुक्रवार ३ एप्रिलपासून दररोज सायंकाळी ५ वाजता आंबटगोड आणि ५.३० वाजता राजा शिवछत्रपती या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक पिढीला भविष्यातील नवे क्षितिज गाठण्यासाठी सदैव प्रेरणा देत असतो. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन हेमंत देवधर यांनी केलं आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्द केलेले मालिकेचं शीर्षकगीत प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामनात आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज, मृणाल कुलकर्णी यांच्या जिजाऊ, अविनाश नारकर यांचे शहाजी राजे, यतीन कार्येकर यांचा औरंगजेब आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हेच सोनेरी क्षण पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. तर आंबटगोड मालिकेतून विध्वंस वाड्याची धमाल आणि राया अबोलीचं आंबटगोड नातं पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *