महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ;नवी दिल्ली : आताच्या धकाधकीच्या जीवनात महागाई देखील फार वाढली आहे. त्यात सिलेंडर प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. महिन्याचा पहिला दिवस आणि नवरात्री अष्टमीच्या पवित्र मुहूर्तावर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सब्सिडी नसलेल्या सिलेंडरचे दर ६१ रूपयांनी कमी करण्यात आले आहे. तर मुंबईत ६२ रूपये, कोलकातामध्ये ६५आणि चेन्नईमध्ये ६४.४० रूपयांची कपात करण्यात आली आहे.
यासंबंधीत लोकांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये सब्सिडी नसलेल्या सिलेंडरचे दर क्रमश: ७४४ रूपये, ७७४ रूपये, ७१४.५० रूपये आणि ७६१.५० रूपये करण्यात आले आहे. एलपीजी सिलेंडरचे हे नवे दर १ एप्रिल म्हणजे आजपासून लागू करण्यात आले आहेत.
Price of LPG cylinders is at Rs 744.00 (decrease by Rs. 61.50) in Delhi and at Rs. 714.50 (decrease by Rs. 62) in Mumbai, today: Indian Oil Corporation pic.twitter.com/s2yAniC25D
— ANI (@ANI) April 1, 2020
त्याचप्रमाणे १९ किलो कमर्शियल सिलेंडरचे दर दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत क्रमश: १,२८५.५० रूपये, १,३४८.५०रूपये, १,२३४.५० रूपये, आणि १,४०२ रूपये असे असणा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.