सर्वसामान्यांना गिफ्ट ; आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ नाही, आजचे दर काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । भारतीय तेल कंपन्यांनी होळीनिमित्त सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. देशभरात आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol Diesel Price) कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या 134 दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज होळीच्या दिवशीही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दरम्यान, 3 नोव्हेंबर 2021 पासून केंद्र सरकारनं पेट्रोल (Petrol Price) -डिझेल (Diesel Price) वरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. तेव्हापासूनच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे (5 State Assembly Election) दरात वाढ झाली नसल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, देशात निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Rate) विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटून गेल्यानंतरही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

देशातील महानगरं पेट्रोलची किंमत (प्रति लिटर) डिझेलची किंमत (प्रति लिटर)
मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
दिल्ली 95.41 रुपये
चेन्नई 101.40 रुपये 91.43 रुपये
कोलकाता 104.67 रुपये 89.79 रुपये
इंधन दर दिलासा मिळणार?

भारतात नोव्हेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उच्चांकी पातळीवर पोहचलं होतं. त्यामुळे इंधन दर वाढवणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. आता, रशियाकडून कच्च्या तेलाचा पुरवठा होणार असल्याने इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *