महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । गुजरातमधल्या शाळांमध्ये आता सहावी ते १२ वीच्या वर्गात विद्यार्थ्यांना श्री भगवदगीता शिकवली जाणार आहे. गुजरातच्या नव्या शैक्षणिक धोरणात याचा समावेश करण्यात आलाय. गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील भाजप सरकारनं भगवदगीता शाळांमध्ये शिकवण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यानुसार ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना भगवदगीतेचे सिद्धांत आणि मूल्यं शिकवली जाणार आहेत.