कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं ?; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १८ मार्च । राज्यासह संपूर्ण देशात आता कोरोना (Covid-19) रुग्णांच्या संख्येत हळुहळु घट होताना दिसत आहे. मागील वर्षी डिसेंबरच्या अखेरीस ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हिरियंटच्या संकटामुळे नागरिकांत घबराहट निर्माण झाली होती. दरम्यान, सध्यातरी देशातील कोरोना (Corona) पेशंटची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र असल्याचे पहायला मिळत होते. मात्र आता एक वेगळी आणि चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

बाहेरील देशात (Foreign country) काही ठिकाणी कोरोनाचे नवे स्ट्रेन आढळून आल्याने आता देशातील आरोग्य मंत्रालयाच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र यामुळे कोणीही घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य (Health Ministry) सचिव राजेश भूषण यांनी सर्व अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहले आहे. यात कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण आणि सोशल डिस्टन्स या पंचसुत्रीची अमंलबजावणी पुढेही चालू ठेवण्यासंदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 2,528 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3,997 बरे झाले आहेत तर 149 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे नागरिकांत पुन्हा घबराहट पसरली आहे. मात्र आरोग्य विभागाकडून काळजी आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *