ऑनलाइन फसवणूक झाल्यास “या” ठिकाणी करा तक्रार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १८ मार्च । गृहमंत्रालयाने ऑनलाइन घोटाळे आणि फसवणुकीला आळा घालून ग्राहकांना सुरक्षा देण्यासाठी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल सुरु केले असून ग्राहकांना www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन आणि इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीची तक्रार नोंदवता येणार आहे.

१ लाख १३ हजार ३७४ कोटींचे घोटाळे (बँक फ्रॉड) चालू आर्थिक वर्षात बँका आणि वित्त संस्थांमध्ये झाल्यामुळे सुरक्षित डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक आर्थिक व्यवहारांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्राहकांना नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलद्वारे फसवणुकीची तक्रार करता येईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे.

ग्राहकांनी सुरक्षित डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक व्यवहार कसे करावेत, यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्वे यापूर्वीच जारी केली आहे. ‘आरबीआय’कडून वेळोवेळी सायबर गुन्ह्यांसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. पण सायबर गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल www.cybercrime.gov.in केंद्र सरकारने सुरु केले असून, आता ग्राहकांना या पोर्टलवर ऑनलाईन आणि इंटरनेटद्वारे होणाऱ्या फसवणुकीची तक्रार नोंदवता येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *