मुंबई-पारबंदर प्रकल्पाला एमएमआरडीएची मान्यता ; मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९मार्च । मुंबई-पुणे प्रवासासाठी सध्या तीन-साडेतीन तास लागतात. वीकेंडला असलेल्या ट्रॅफिक जॅमचीही डोकेदुखी मोठी असते. पण आता या सगळ्यातून सुटका होऊन शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात मुंबई-पारबंदर प्रकल्प मुंबई-पुणे दृतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. मुंबई-पारबंदर प्रकल्पाच्या प्रस्तावाला एमएमआरडीएची मान्यता आहे. मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. तसंच यासाठी ९४७ कोटी २५ लाखांच्या निधीलाही मान्यता दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *