पुण्यातील युवा इंजिनियरची जबरदस्त कामगिरी ; 50 हजारपेक्षाही कमी किमतीत तयार होणार व्हेंटिलेटर,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ;पुणे : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी चांगले आणि कमी किमतीतील उपचार उपलब्ध व्हावे यासाठी पुण्यात एका संस्थेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. नोक्का रोबोटिक प्रायवेट लिमिटेड संस्थेचे को-फाऊंडर निखिल कुरेले यांनी कमी किमतीतील व्हेंटिलेटर्सची निर्मिती करत आहे. याची किंमत 50 हजारपेक्षा कमी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनासारख्या महाकाय साथीच्या रोगात हे व्हेंटिलेटर्स अनेक नागरिकांचे जीव वाचवू शकतात असा विश्वास युवा इंजिनियर निखिल यांनी व्यक्त केला आहे.

निखिल हे पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीत काम करतात. ह्या कंपनीत पाण्याविना चालणारे रोबोट तयार केले जातात. ह्या कंपनीने कोरोनाग्रस्तांसाठी खास कमी किमतीमध्ये व्हेंटिलेटर बनवण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं आहे. नोक्का रोबोटिक्स या कंपनीची मागच्या वर्षीची उलाढाल फक्त 27 लाख रुपये होती. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक आणि एरोस्पेस अभियंता नोक्का रोबोटिक्समध्ये काम करतात. सध्या भारतात फक्त 40 हजारहून अधिक व्हेंटिलेटर आहेत. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता आणि या महाकाय संकटाचा सामना करण्यासाठी आणखी व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे नागरिकांना कमी किमतीमध्ये जर हे उपलब्ध झाले तर त्यांचा जीव वाचण्यास मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *