धोनीने आपल्या स्टाईलमध्ये सामना संपवला . २ एप्रिल २०११

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ;पुणे; धोनीचा षटकार म्हंटल की आजही रवी शास्त्री यांचा आवाज ऐकू येत आहे. ‘धोनीने आपल्या स्टाईलमध्ये सामना संपवला’, हे शब्द क्रिकेट चाहत्यांच्या मनावर कोरले गेले आहे. ट्विटरवर हाच ट्रेंड चालू आहे. ज्यामध्ये जेव्हा धोनीने षटकाराने संघाला विजय मिळवून दिला.
2 एप्रिल 2011 म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यांची स्वप्नपूर्वी. तब्बल 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताने वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर मारलेला तो विजयी षटकार आजही सर्वांच्या स्मरणात आहे. आज भारताने वर्ल्ड कप जिंकून 9 वर्ष पूर्ण झाली. मात्र लॉकडाऊनमुळे क्रिकेट चाहते या विजयाचा उत्साह साजरा करू शकत नाही, म्हणून सध्या सोशल मीडियावर वर्ल्ड कपबाबत भन्नाट ट्रेंड सुरू झाले आहेत.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग लवकर बाद झाल्यानंतर, भारताचा डाव सांभाळला तो गौतम गंभीरने. त्यानंतर धोनीने नेहमी प्रमाणे हेलिकॉप्टर श़ॉटने सामन्यांची विजयी सांगता केली. दरम्यान, सध्या लॉकडाऊनमध्ये घरात असलेल्या चाहत्यांनी ट्वीटरवर एक अनोखा ट्रेंड सुरू केला आहे. यात तुम्ही धोनीने षटकार मारला तेव्हा काय करत होतात? असा सवाल एकमेकांना विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *