महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ;जिनिव्हा, 02 एप्रिल: जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. तब्बल 9 लाख 35 हजाल 817 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 47 हजाल 208 लोकांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र येत्या काळात हा आकडा दुपटीने वाढण्याची शक्यता जागितक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने, कोरोनाव्हायरस सर्व जगभर झपाट्याने पसरेल. त्यामुळे एका आठवड्यात मृत्यूची संख्या दुपटीने वाढली, अशी भीती व्यक्त केली. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयसियस यांनी कोविड-19 येथे लढा देण्यासाठी एकत्र उभे राहण्याचे आवाहन केले.
टेड्रॉस यांनी यावेळी, “कोरोनाव्हायरस पसरून चार महिने झाले आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रत्येक महिन्यात संसर्ग जलद गतीन आहे. ही चिंतेची बाब असून यासाठी आम्ही जगभरातील शास्त्रज्ञांशी संवाद साधत आहोत”, असे सांगितले. तर, जागतिक आरोग्य संघटनेचे टेक्निकल अॅडव्हायझर मॅथ्यू ग्रिफिथ यांनी, “एखादा देश कोरोनाव्हायरसपासून सुरक्षित असेल, अशी WHO अपेक्षा करत नाही. कारण कोरोनाव्हायरस कुठेही पसरू शकतो.काही देश आणि क्षेत्रांमध्ये कोरोनाव्हायरस कमी होतो आहे, मात्र त्या ठिकाणाहून इतर नवीन ठिकाणी त्याचा उद्रेक होणं चिंतेची बाब आहे. सध्या फक्त युरोपवर लक्ष केंद्रीत केलं जातं आहे, मात्र इतर क्षेत्रामध्येही त्याचा उद्रेक होऊ शकतो”, अशी भीती व्यक्त केली आहे.