महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; न्यूयॉर्क 1 एप्रिल : सर्वच देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर जगभर संशोधन सुरू आहे. काही देशांमध्ये कोरोनावर लस शोधल्याचा दावाही केला जातोय. मात्र त्याच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी आता आकडेवारींच्या आधारी काही नवे निष्कर्ष काढले आहेत. हे निष्कर्ष धक्कादायक आहे. त्यांच्या मते 25 टक्के लोकांमध्ये COVID 19 हा व्हायरस असला तरी त्याची लक्षणं दिसत नाही. मात्र असे लोक कोरोनाचे वाहक ठरू शकतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळ्यांनीच मास्क वापरणं योग्य राहिल असं दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. याबाबतचं वृत्त CNNने दिलं आहे.
सुरूवातीला WHO आणि अनेक अमेरिकन्स संशोधन संस्थांनी प्रत्येकानेच मास्क वापरण्याची गरज नाही असं म्हटलं होतं. ज्यांना काही लक्षणं दिसतात त्यांनीच मास्क वापरला पाहिजे. मास्क वापरण्याची पहिली गरज ही रूग्ण आणि फिल्डवर काम करणारे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी आहेत असं त्यांचं मत होतं. मात्र आता नव्या आकडेवारींचा आणि काही पुराव्यांचा अभ्यास केल्यावर त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.