महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ मार्च । मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये वाद पेटला आहे. मुंबई महापालिकेने (BMC) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना दुसऱ्यांदा नोटीस पाठवली. त्यामुळे आता नारायण राणेंनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे.
नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं Adhish नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेनं दोन वेळा राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या घराला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती. आता नारायण राणेंनी याा नोटीशीविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.
अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावरून पालिकेची राणेंना १५ दिवसांची नोटीस मिळाली आहे. कारवाई थांबवण्यासाठी राणेंची हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.