नाशिकात भररस्त्यावर 50 फूट उंच कारंजा ; लाखो लिटर पाणी वाया ; पहा Video

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ मार्च । उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उन्हाचा पारा वाढल्यामुळे अनेक शहरांमध्ये आतापासून पाणी टंचाई निर्माण होत आहे. शहरी भागात पाण्याची कपात केली जात आहे. असं असताना नाशिक (nashik) शहरात पाईपलाईन (Water pipeline bursts) फुटल्याची घटना घडली आहे. पाइपलाइन फुटल्यामुळे तब्बल 50 फूट उंच कारंजा उडाला. यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

नाशिक जिल्ह्यातील अंबड लिंक रोडवर आज सकाळीही पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. अंबड एमआयडीसीची (Ambad MIDC) पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे तब्बल 50 फुटाहुन उंच पाणी उडाले होते. त्यामुळे रस्त्यावर एकच धावपळ उडाली.

रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यामुळे दुकानदारांची एकच त्रेधातिरपट उडाली. एवढंच नाहीतर रस्त्यावर वाहतूक सुद्धा थांबली होती. अचानक फुटलेल्या पाइपलाईनमधून तब्बल तब्बल 50 फूटाहून उंच असा कारंजा नाशिककरांना पाहण्यास मिळाला.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे ही पाईपलाईन फुटल्याची माहिती समोर आली आहे. पाईपलाईन दुरस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *