महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ मार्च । सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्स आता सहाव्यांदा आयपीएल चॅम्पियन हाेण्यासाठी सज्ज झाला आहे. जुन्या खेळाडूंमुळेच मुंबईचे याबाबतचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे रिटेन खेळाडूंमुळे मुंबई सर्वात बलाढ्य टीम मानली जाते. दुसरीकडे हैदराबाद संघाच्या विजयाची मदार युवा खेळाडूंवर असेल. गत सत्रात नेतृत्वावरून हैदराबाद संघात वादाचा सामना रंगला हाेता. मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद संघावर टाकलेला हा प्रकाशझाेत.
मुंबई इंडियन्स : वेगवान गोलंदाजांमुळे वरचढ; ईशान-ब्रेविससारखे युवा फाॅर्मात
खास नजर : टीम डेव्हिड हा ऑस्ट्रेलियाचा आहे. तो मुंबईच्या छाेट्या मैदानावर हीरो ठरेल.
जमेची बाजू : मुंबईने रोहित, बुमराह, पोलार्ड आणि सूर्यकुमारला रिटेन (राखून) केले. हीच संघाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. बुमराह व पोलार्ड सध्या फाॅर्मात आहेत. ईशान-ब्रेविसमध्येही लक्षवेधी खेळीची क्षमता आहे.
दुबळेपण : फिरकीची बाजू दुबळी आहे. राहुल, जयंतच्या अनुपस्थितीमुळे संघ अडचणीत. एम. अश्विन व मयंक मार्कंडेयकडून माेठ्या खेळीची आशा करावी लागणार आहे.
हैदराबाद : जायबंदी विलियम्सन डाेकेदुखी; विदेशी खेळाडू मजबूत
जमेची बाजू : अब्दुल, प्रियम, अभिषेक व कार्तिक त्यागीसारखे युवा खेळाडू आहेत. युवांच्या बळावर हैदराबादला किताबाची आशा आहे. लाइन-अपमध्ये विदेशी खेळाडूंचा सहभाग फायदेशीर ठरेल. निकालेस पुरन व मार्काे जान्सेनचाही मोठा फायदा हाेणार आहे. भुवनकडे नेतृत्व आहे.
दुबळेपण: विलियम्सनची दुखापत ही संघासाठी यंदाच्या सत्रात डाेकेदुखी ठरू शकेल. तो अद्याप यातून सावरलेला नाही. त्याच्याकडून केलेल्या मोठ्या खेळीची आशा अपूर्ण राहत आहे.