IPL 2022: आयपीएल तिकीट विक्रीला सुरुवात, कुठे खरेदी करू शकता? घ्या जाणून

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ मार्च । इंडियन सुपर लीग 2022 (IPL 2022) स्पर्धेला येत्या चार दिवसात म्हणजेच 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा 15 वा हंगाम असणार आहे. दरम्यान, आयपीएल चाहत्यांसाठी खुशखबर आली आहे. आयपीएल तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे.

आयपीएल 2022 मधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स(CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या गतविजेत्या आणि गतउपविजेत्या संघात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, आठवड्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेल्या या स्पर्धेतील सामन्यांसाठीच्या तिकीट विक्रीला आजपासून म्हणजेच 23 मार्च रोजी दुपारी 12 वाजता आयपीएल तिकीट बुकिंगला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, मुंबई आणि पुणे दोन्ही शहरांमधील सामन्यांसाठी बुधवारपासून तिकीटविक्री सुरू होईल.

ऑनलाईन होणार तिकीट विक्री

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सामन्यांसाठी जी तिकीट विक्री होणार आहे, ती ऑनलाईन पद्धतीने होईल. चाहते आयपीएलच्या अधिकृत वेबसाइट www.iplt20.com वर तिकीट खरेदी करू शकतात. याशिवाय आयपीएलची तिकिटे www.BookMyShow.com वरही उपलब्ध असतील.

तिकीटाची रक्कम किती असेल?

बुक माय शोच्या वेबसाइटनुसार, 26 मार्च रोजी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यासाठी चार प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत. यामध्ये 2500, 3000, 3500 आणि 4000 रुपयांची तिकिटे आहेत. पहिल्या सामन्याशिवाय इतर सामने आणि स्टेडियम्सबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएल सामन्यांची विक्री 800 रुपयांपासून सुरू आहे आणि तिकीटे 4000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

आयपीएलमधील साखळी फेरीतील 70 सामने मुंबई आणि पुणे येथील 4 स्टेडियमवर होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम या मैदानांवर सामने होणार आहेत, तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम गहुंजे येथे सामने होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *