वीर सावरकरांवर हिंदीत येतोय ‘बायोपिक’; ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ मार्च । देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चर्चा असतानाच आता आणखीन एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आलीय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट म्हणजेच बायोपिक बनवण्याची घोषणा करण्यात आली असून सरबजीत या चित्रपटासाठी प्रंचड मेहनत घेणारा अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची भूमिका साकारणार आहे. सावरकरांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहे.

https://www.instagram.com/randeephooda/?utm_source=ig_embed&ig_rid=df808765-ed12-4026-bae2-0c8e022f0464

…म्हणून रणदीपची निवड
सावरकरांची भूमिका साकारण्याचं मोठं आव्हान आता रणदीपसमोर आहे. मात्र ज्या कामामध्ये जीव ओतावा लागतो असं कामच स्वीकारावं अशी भूमिका या चित्रपटासंदर्भात बोलताना रणदीपने मांडलीय. रणदीपचं सध्या नेटफ्लिक्सवरील ‘एक्स्ट्रॉर्शन’ या चित्रपटासाठी कौतुक होताना दिसतंय. विशेष म्हणजे आता रणदीप सावकरांची भूमिका साकारणार असून या चित्रपटाची निर्मितीही ‘सरबजीत’ चित्रपटाचे निर्मातेच करणार आहे. या चित्रपटामधील सावरकरांच्या भूमिकेसाठी शरीरयष्टी आणि सर्वच बाबतीत रणदीप अगदी उत्तम आहे, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

कथा सांगण्याची योग्य वेळ
“सध्या त्या कथा सांगण्याची उत्तम वेळ आहे ज्यांच्याकडे यापूर्वी आपण कानाडोळा केला होता. वीर सावरकरांच्या आयुष्यावरील चित्रपटाची कथा ही एक उत्साहाने भरलेली कथा असेल. आपण आपला इतिहास पुन्हा पहावा यासाठी ही कथा प्रेरणादायी ठरेल,” असं महेश मांजरेकर यांनी म्हटलंय. “आम्ही या चित्रपटावर काम सुरु केलंय हे सांगताना मला फार आनंद होतोय. चित्रपटाच्या पटकथेचं काम जवळवजळ पूर्ण होत आलंय. लवकरच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे,” असं महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केलंय.

कधी सुरु होणार चित्रिकरण?
याच वर्षी जून महिन्यामध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचं चित्रिकरण याच वर्षी जून महिन्यामध्ये सुरु होणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण लंडन, महाराष्ट्र आणि आंदमान निकोबार बेटांवर होणार आहे. चित्रपटामध्ये वेगवेगळ्या कालावधीत भारताच्या स्वातंत्र्यासाठी कसा लढा देण्यात आला यावर भाष्य करण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *