महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ मार्च । कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना मिळणारी ५० हजार रुपयांची मदत दोन महिन्यात देण्यात यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. केंद्र शासनाकडून ही मदत दिली जाते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांचा अर्ज आल्यानंतर, त्याची पडताळणी करून मदत पोहोचेपर्यंतचा कालावधी सुप्रीम कोर्टाने निश्चित केलाय. दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आणि आलेले अर्ज यात बरीच तफावत असल्याने केंद्र शासनाने अर्जांची पडताळणी करावी असेही आदेश केंद्र शासनाने दिलेत.
यासंदर्भात अर्ज करताना नातेवाईकांनी तीन महिन्याच्या आत अर्ज करायचा आहे. आंध्र प्रदेश, गुजरात ,महाराष्ट्र ,केरळ या चार राज्यातून आलेल्या आर्जांमध्ये आणि आलेल्या अर्जांमध्ये तफावत असल्याचं निरिक्षण केंद्र शासनाने नोंदवलय. २८ मार्च २०२२ पर्यंत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनी ६० दिवसात अर्ज करायचा आहे. त्यानंतर मात्र ९० दिवसांपर्यत अर्ज स्वीकारले जाणार आहे.
Supreme Court allows Centre to probe fake ex-gratia claims on the death of kin due to COVID-19; says Centre can verify 5% of claims in 4 states which had a wide difference between number of claims and recorded deaths. States are Andhra Pradesh, Maharashtra, Gujarat and Kerala
— ANI (@ANI) March 24, 2022
महाराष्ट्र शासनाने कोविडने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना अर्ज करण्यासाठी पोर्टल तयार केले आहे. तिथे अर्ज करायचा आहे. mahacovid19relief.in या पोर्टल लिंकवर जावून नोंदणी करुन त्याद्वारे अर्ज भरता येईल. (covid death)