महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।सलमान मुल्ला । दि.२४ मार्च । कळंब। कळंब मध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय साठी दोन वर्षांपूर्वी इमारत बांधून ठेवली आहे ,पण प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही इमारत धूळ खात पडलेली आहे . या इमारतीत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय लवकर सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मत महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचेअध्यक्ष अँड. वसंतराव साळुंखे यांनी कळंब येथे विधिज्ञ मंडळातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते .
कळंब येथील न्यायालयात विधिज्ञ मंडळाच्या वतीने दिनांक २४ रोजी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे नूतन अध्यक्ष अँड.वसंतराव साळुंके व संचालक अँड . मिलिंद पाटील यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते . विधीज्ञ मंडळींसाठी भविष्यात विविध योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळंब येथील जेष्ठ विधीज्ञ अॅड. एस. एस. लोमटे हे होते. या वेळी व्यासपिठावर महाराष्ट्र आणी गोवा बार कौन्सिलिंग चे नूतन सदस्य अँड. मिलिंद पाटील , कळंब विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. मंदार मुळीक,जी. सी. अभंग, व्ही. बी. दुगाने, जी. एस. चव्हाण, आदी उपस्थित होते . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड . प्रविण यादव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस .आर . फाटक यांनी केले . तर आभार अँड. मंदार मुळीक यांनी मानले . यावेळी कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विधिज्ञ बी. एन. लोमटे, एस. वाय. काळे, ए. आर. पायाळ, ए. जी. माने, डी. एफ. गायकवाड, डी. एस. पवार, डी. एन. गोंड, आर. आर. शिंदे, बी. एस. लोमटे, ए. जे. लोमटे (पाटील), सी. बी. बिक्कड, बी. बी. साठे, व्ही. के. माने, ए. जे. चोंदे, बी. बी. कोळपे , अमर ढेपे . श्री मनगिरे , श्री . मुळे , पी . आर . सोनटके . आदी उपस्थित होते .