९ मे पर्यंत युद्ध संपवा; रशियन सैन्याला आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे सध्या संपूर्ण जगावर चिंतेचं वातावरण असताना लवकरच हे युद्ध संपण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या लष्करानेच असा दावा केला आहे. युक्रेन लष्कराच्या दाव्यानुसार, ९ मे रोजी रशिया हे युद्ध संपवू इच्छित आहे. Kyiv Independent च्या वृत्तानुसार, युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफच्या गुप्तचर सूत्रांनी दावा केला आहे की, रशियन सैन्याला युद्ध ९ मे पर्यंत संपलं पाहिजे असा आदेश देण्यात आला आहे.

९ मे हा दिवस रशियामधील नाझी जर्मनीवरील विजय म्हणून साजरा केला जातो. दरम्ान रशिया आपल्या हजारो नागरिकांना त्यांच्या देशात घेऊन जात असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. या नागरिकांना ओलीस ठेवत आम्हाला युद्धात माघार घेण्यास भाग पाडण्याचा कट असल्याचाही त्यांचा दावा आहे.

असोसिएट प्रेसच्या वृत्तानुसार, युक्रेनचे लोकपाल डेनिसोवा यांनी चार लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या इच्छेविरोधात रशियात नेण्यात आलं असून त्यामध्ये ८४ हजार लहान मुलं असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे रशियानेही जवळपास हीच संख्या दिली असून या लोकांना रशियाला जायचे होते असा प्रतिदावा केला आहे.

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पाश्चिमात्य देशांनी नवे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून युक्रेनला माणुसकीच्या आधारावर मदत करण्याचं वचन दिलं. पण युक्रेनच्या राष्टाध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मागितलेल्या मदतीच्या तुलनेत लष्करी सहाय्य कमी मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *