क्रिकेट विश्वात आणखी एका दिग्गज कॅप्टन पद सोडणार !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । आयपीएल 2022 ची सुरूवात होण्यापूर्वीच क्रिकेट विश्वात मोठी घटना घडली आहे. महेंद्रसिंह धोनीनी (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची कॅप्टनसी सोडली आहे. आता रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सीएसकेचा कॅप्टन असेल. धोनीनंतर क्रिकेट विश्वातील आणखी एका दिग्गज कॅप्टननं पद सोडण्याचा इशारा दिला आहे. हा कोणत्या आयपीएल टीमचा नाही तर आंतरराष्ट्रीय टीमचा कॅप्टन आहे.

इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं (Joe Root) कॅप्टनसी सोडण्याचे संकेत दिले आहेत. इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्या मालिकेतील तिसरी आणि शेवटची टेस्ट सुरू आहे. कॅप्टन म्हणून आपली ही शेवटची टेस्ट असू शकते, असे संकेत रूटनं दिले आहेत.

इंग्लंडच्या टेस्ट टीमची कामगिरी गेल्या काही महिन्यात निराशाजनक झाली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला अ‍ॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडचा मोठा पराभव झाला होता. या पराभवानंतर इंग्लंडचे कोच ख्रिस सिल्वरवूड यांना पद सोडावे लागले होते. सिल्वरवूड यांनी पद सोडल्यापासूनच रूटच्या कॅप्टनसीचे भवितव्य अधांतरी आहे. जो रूट 2017 पासून इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *