महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । ज्येष्ठांनंतर आता मुलांचे वेगात लसीकरण करण्यासाठी तयारी सुरू आहे. बायोलॉजिकल ई आणि सीरम इन्स्टिट्यूटने भारतीय औषध नियंत्रकांकडे ५ ते १२ वर्षांच्या मुलांना लस देण्यासाठी मंजुरी मागितली आहे. देशात १२ वर्षांवरील मुलांना भारत बायोटेक आणि झायडस कॅडिलाची लस दिली जात आहे. पुढील आठवड्यात या कंपन्यांच्या लसीच्या आपत्कालीन वापराची शिफारस केली जाऊ शकते.
कोव्होव्हॅक्स-सीरम : ७ ते १२ वर्षांच्या मुलांच्या लसीस मंजुरी मागितली. कंपनीचा दावा : दोन्ही डोस घेतल्यास ९५% प्रभावी आहे. पहिल्या डोसनंतर २२ व्या दिवशी दुसरा डोस द्यावा. १२ वर्षांवरील मुलांना देण्याची परवानगी मिळाली आहे.
कोर्बेव्हॅक्स-बायोलॉजिकल ई : ५ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी वापराची मंजुरी मागितली. तिला १२ वर्षांवरील मुलांना देण्याची परवानगी मिळाली आहे. दुसरा डोस २८ व्या दिवशी दिला जाईल. कंपनीचा दावा : ९० % पर्यंत प्रभावी.
जेनोव्हा बायो फार्मास्युटिकल्स : १८ ते ८० वयोगटातील लोकांसाठी लसीची परवानगी मागितली आहे.याचे दोन डोस आहेत.