महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून जनसेवक प्रसाद संजय ढमढेरे प्रभाग क्रमांक १५ मधील शाहुनगर, संभाजी नगर, पूर्णानगर, शिवतेज नगर, फुलेनगर, शिवाजी पार्क, HDFC कॉलनी या परिसरामध्ये दि. १९, २०, आणि २१ मार्च या दिवशी शिवजयंती घरोघरी रांगोळी दारोदारी हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये सर्व नागरिक आणि महिलाभगिनींचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. घरोघरी लोकप्रबोधन व्हावे आणि श्री शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा हा या उपक्रमामागील उद्देश होता.
या रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात महिला व मुले यांच्या मोठ्या सहभागाने पार पडला. यामध्ये प्रथम क्रमांक सौ. लक्ष्मी कोकाटे , द्वितीय क्रमांक सौ. शितल मोटे, तृतीय क्रमांक कु.अंकिता इंगळे यांनी पटकाविला.स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये उपस्थित मान्यवर सर्वश्री विलास जेऊरकर, संजय ढेंबरे, राजाभाऊ म्हस्के, संपत बोत्रे, परबती वाडकर , यशवंत कन्हेरे, सुजित रासकर, सौ. मोना नेहते, स्वा सावरकर प्रतिष्ठान, स्वा. सावरकर मित्र मंडळ आणि सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघ या सर्वांनी मोलाची उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश पवार यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्री संपत बोत्रे यांनी मानले.