पूना महाविद्यालय स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । पुणे । अंजुमन खैरूल ईस्लाम संस्था संचलित पुना महाविद्यालय, पुणे येथे आज पुना महाविद्यालय स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन अंजुमन खैरूल ईस्लाम संस्थेचे सचिव श्री. हानी अहमद फरीद आणि संस्था सदस्य, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉ. हनिफ लकडावाला यांच्या हस्ते करण्यात आले. पुना महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या प्रसंगी बोलताना श्री. हनी फरीद यांनी आधुनिक काळात स्पर्धा परीक्षांची आवश्यकता आणि महत्त्व विशद केले.

पुना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा. आफताब अन्वर शेख यांनी स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी नियोजन आणि संसाधनाच्या उपलब्धतेचे महत्त्व सांगितले. येत्या काळात महाविद्यालयातून हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सर्व मदत देण्याचे आश्वासन प्राचार्य डॉ. शेख यांनी दिले. डॉ. लकडावाला यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी आवश्यक अंगभूत गुणाचे विविध प्रेरणात्मक उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण दिले. पीसी ॲकॅडमी स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. मुखतार शेख यांनी महाविद्दालयाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे ध्येय आणि उद्दिष्टे प्रस्तुत केली.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. मोईनूद्दीन खान आणि डॉ. ईक्बाल शेख यांनीही आपली मार्गदर्शनीय उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी प्रचंड संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *