Bhagwant Mann: आमदारांना एकच पेन्शन मिळणार ; पंजाब सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । पंजाब सरकारचे अनेक मोठे निर्णय प्रस्तावित असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्यातीलच एक मोठी बाब म्हणून पंजाबच्या माजी आमदारांची, मंत्र्यांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल झाले होते. मात्र, आता माजी आमदारांच्या पेन्शनबाबत कोणता निर्णय घेण्यात आला, हे स्वत: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

”आमदार हे हात जोडून लोकांना विनंती करतात की, आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. पण, सध्या 4,5 किंवा 6 वेळा आमदार बनले आहेत. जे सध्या काही कारणास्तव (तिकीट न मिळाल्याने, पराभूत झाल्याने) विधानसभेत नाहीत. त्यांना लाखो रुपयांची पेन्शन मिळते, कुणाला महिन्याला 3.5 लाख रुपये मिळतात, कुणाला 4.5 लाख, कुणाला सव्वा 5 लाख रुपयेही दरमहा पेन्शन मिळते. विशेष म्हणजे काही खासदार आहेत, जे पूर्वी आमदार होते. ते आमदार आणि खासदारकीचीही पेन्शन घेत आहेत”, त्यामुळे, पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले.

पंजाब सरकारच्या निर्णयानुसार आमदार एकदा व्हा, दोनदा व्हा, चारदा व्हा किंवा 10 वेळा आमदार व्हा. पण, आमदारकीची पेन्शन ही केवळ एक टर्मचीच मिळणार आहे. कारण, सेवा करणाऱ्यांना कुठलिही पेन्शन योग्य नाही. पंजाब सरकारच्या तिजोरीवर या पेन्शन योजनांमुळे मोठा आर्थिक भार पडत होता. त्यामुळे, केवळ 1 टर्म पेन्शनचा हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. अखेर इन्कलाब झिंदाबाद.. असेही त्यांनी म्हटले.
पंजाबमधील आमदरांचं सध्याचं पेन्शन स्वरुप कसं

सध्याच्या घडीला आमदार म्हणून एकदा निवडून येणाऱ्या व्यक्तीस आयुष्यभरासाठी दरमहा ७५,१५० रुपये पेन्शन स्वरुपात मिळतात. तोच आमदार जर एक पेक्षा अधिक वेळा निवडून आला असेल, तर त्या प्रत्येक टर्मच्या पेन्शनची ६६% रक्कम त्याला दरमहा मिळते. बातमीनुसार माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल, काँग्रेस नेते लाल सिंह, माजी मंत्री सर्वन सिंह फिल्लौर यांना दरमहा ३.२५ लाख रुपये पेन्शन रक्कम म्हणून मिळतात. ज्येष्ठ नेते बीएस भुंडर यांना दरमहा २.७५ लाख रुपये तर एस एस धिंडसा यांना २.२५ लाख रुपये निवृत्ती वेतनाच्या स्वरुपात मिळत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *