महागाई भडका; 800 औषधांच्या किंमती वाढणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ मार्च । महागाईचा भडका अजूनही कायम आहे. आता जीवनावश्यक वस्तू आणि इंधन दरवाढीसोबत आणखी एक फटका बसणार आहे. जीवनावश्यक 800 औषधांच्या किंमती वाढणार आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला होणार आहे.

डायबिटीस, कॅन्सर, हायबीपीची औषधं महागणार आहेत. यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून 1 एप्रिलपासून औषधांचे दर वाढवण्यात येणार आहेत. आता औषधंही महागणा आहेत. एरवी सगळ्यांच्या घरात असणा-या पॅरासिटॉमोलचे सुद्धा दर वाढणार आहेत. सोबतच 800 प्रकारची औषधांचे दर वाढरणार आहेत. ही दरवाढ 10 टक्क्यांनी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पेनकिलर अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरलसह इतर आवश्यक औषधांच्या दरवाढीचे संकेत दिले आहेत. ड्रग प्राईसिंग अथॉरिटीनं दरवाढीला मंजुरी दिली. एप्रिलपासून दरवाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *