![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ मार्च ।
मेष-
धार्मिक कार्यात भाग घ्याल. मात्र एखादे काम मागे पडले तर मागेच पडेल. थोडी चपळाई करा. फायदे होतील ग्रहांचे भ्रमण तुम्हाला सर्व दृष्टीने फायदेशीर ठरणारे राहील, नोकरीत तुमच्या मर्जीनुसार काम राहील. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. तुमचे महत्व वाढेल, आर्थिक बाजू चांगली राहील, अनेक मार्गानी धनप्राप्ती होईल. आवडत्या लोकांच्या सहवासात मन प्रसन्न राहील. नोकरीत प्रगती होईल. उच्चाधिकार मिळेल. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळेल. टीप रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
वृषभ-
या आठवड्यात भाग्याची चांगली साथ तुम्हाला या सप्ताहात मिळणार आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत सप्ताह फार चांगला जाणार आहे. उत्तम प्रवासाच्या संधी चालून येतील, मौजमजा करण्यासाठी पैसा हाती येईल. मनावरचा ताण हलका होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आपल्या सर्व कामात जोडीदाराची चांगली साथ राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील, मनासारख्या घटना घडतील. योग्य सल्ला मिळेल. घरी पाहुणे येतील. उत्तरार्धात वाहने जपून चालवा, टीप रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस
मिथुन-
ग्रहमान संमिश्र राहील. काही अनुकूल घटना घडतील. अडचणी येतील आणि त्यातून मार्ग पण निघेल. तथापि, सतत कार्यरत राहावे लागेल. आराम करून चालणार नाही. वाहन जपून चालवा. डोक्यात विचारांचे काहूर माजलेले असताना वाहन चालवणे योग्य राहणार नाही हे लक्षात घ्या. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. प्रलोभनाला भुलू नका. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. कामाचा ताण राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार जपून करा टीप मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस
कर्क-
पूर्वार्धात ग्रहमानाची अनुकूलता राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील, जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील, तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील, अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या व्यवहाराचा अनपेक्षितपणे लाभ होईल. अनावश्यक ताण घेऊ नका, प्रवासात काळजी घ्या. काही हितचिंतक तुमच्या माघारी तुमची बदनामी करतील. टीप- रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
सिंह –
या सप्ताहात दगदग होईल. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, उष्णतेच्या विकारापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी उपाययोजना करा. उन्हात फिरू नका. पाणी भरपूर प्या. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा, जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल; मात्र थोड़ा रुसवा फुगवा राहील, गैरसमज होऊ देऊ नका, व्यवसायात विक्री चांगली होईल, अचानक धनलाभ होईल. काहीना सप्ताहाच्या शेवटी अचानक प्रवास करावा लागेल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. टीप मंगळवार, बुधवार, शनिवार चागले दिवस..
कन्या –
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येईल. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. मुलाच्या यशामुळे आनंद वाटेल. त्याचे कौतुक होईल. मात्र ग्रहमानाची अनुकूलता सप्ताहाच्या उत्तरार्धात म्हणावी तशी राहणार नाही. त्यामुळे फाजील आत्मविश्वास दाखवू नका. आरोग्याच्या बाबतीत बेपर्वाई नको. हितशत्रूपासून सावध राहा. जोडीदाराशी वाद घालू नका. कायद्याची बंधने पाळा. वाहनाची दुरुस्ती वेळीच करून घ्या. प्रवास शक्यतो टाळलेले बरे. प्रवासात दगदग होईल. टीप रविवार, सोमवार, शुक्रवार चांगले दिवस,
तूळ –
नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. घरी पाहुणे रावळे याची सतत ये-जा चालू राहील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल, सहकारी वर्गाला सांभाळून घेतले पाहिजे. काहीना नवीन प्रकल्पात मोठी जबाबदारी घ्यावी लागेल, ती जबाबदारी आपण समर्थपणे पूर्ण कराल. त्यात तुमचा फायदा होईल, आर्थिक बाजू बळकट होईल, विविध प्रकारचे लाभ होतील. मुलाच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. त्यांना योग्यतेनुसार संधी मिळेल. टीप रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.
वृश्चिक –
नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. व्यवसायात विक्री चांगली होईल. सतत कार्यरत राहावे लागेल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होतील, अचानक एखादी मोठी ऑर्डर मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील, अनुकूल घटना घडतील, सुखसोयी वाढवून मिळतील. घरात चैनीच्या वस्तू खरेदी कराल. घरी पाहुणे येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. मुलाच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळ काढा. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
धनू –
विविध लाभ होतील धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. विविध प्रकारचे फायदे होतील. मालमतेच्या व्यवहारात यश मिळेल. काहींना अचानक मोठी प्राप्ती होईल. आवडते पदार्थ ताटात दिसतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील, भावडांशी संख्य राहील, गैरसमज दूर होण्यासाठी प्रयत्न करा. घरात लोकांची ये-जा चालू राहील, अप्रिय लोकांसाठी वेळ द्यावा लागेल. नोकरीत एखाद्या सहकान्यामुळे डोक्याला वैताग होईल. मुलाच्या उद्योगाकडे लक्ष द्या. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
मकर –
मनात आनंदी विचार राहतील. कामात उत्साह राहील. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येईल. जीवनसाथीशी सूर जुळतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली होतील. आर्थिक बाजू चांगली राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल; मात्र कागदपत्रे वाचून मगच सही करा. भावंडांशी गैरसमज होतील. प्रवासात दगदग होईल. थोडी काळजी घेतली पाहिजे. टीप- रविवार, सोमवार, बुधवार चागले दिवस.
कुंभ –
समिश्र ग्रहमान राहील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. काही अनावश्यक खर्च होईल. ‘बजेट’ गोलमाल होईल; मात्र पैशाची अडचण निघून जाईल. प्रवासाचे योग येतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. एखाद्या मुद्द्यावर मतभेद होतील. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. खाण्या-पिण्याचे तंत्र सांभाळा, पचेल तेच खा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. थोडे गैरसमज होऊ शकतात. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. टीप मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.
मीन-
अनुकूल घटना घडतील. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. अनेक लोकांचे सहकार्य मिळेल. कायदेविषयक कामे मार्गी लागतील. मित्र मैत्रिणी याच्या भेटी होतील. त्याच्याकडून भेटवस्तू मिळतील. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. यशाच्या पायऱ्या चढत असताना लोकांच्या ईर्षेला पण तोड द्यावे लागेल. लोकांशी संयमाने वागणे, बोलणे आवश्यक आहे. टीप- रविवार, सोमवार, शनिवार चांगले दिवस.