महाराष्ट्र 24 :- पिंपरी । विशेष प्रतिनिधी । सध्या जगभर थैमान घातलेल्या कोविड19 या आजारामुळे देशभरातील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. त्यातच विशेषतः या महामारीवर मात करण्यासाठी अहोरात्र आपल्या जीवाची बाजी लावत असलेल्या वैद्यकीय व आरोग्यसेवा पुरवणाऱ्या अधिकारी व कर्मचारी आरोग्यदूतांचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मनस्वी आभार मानले आहेत. महापालिका आयुक्तांना या बाबतचे पत्र देऊन आरोगदूतांप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सदर पत्रात आमदार बनसोडे यांनी आरोग्य कर्मचारऱ्यांना संबोधून म्हटले आहे की, आपण कोरोनविरुद्धच्या युद्धाचे सैनिक आहात. शहरातील प्रत्येक नागरिक आपल्या कामाबाबत आपला ऋणी आहे. कोरोना रुग्ण विभागात प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या डॉक्टर, परिचारिकांना ईश्वर अधिक शक्ती देवो! आपल्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही देत , आरोग्यदूतांच्या कामात आम्ही सहकार्य करू शकत नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली आहे.
सर्व नागरिकांनी शासनाचे आदेश पाळले तर वैद्यकीय सुविधेवर येणारा ताण निश्चितच कमी होईल. आरोग्यदूतांच्या कामावर आपला विश्वास व्यक्त करत त्यांना जोखमीच्या काळात आरोग्य लाभो अशी भावना आयुक्तांना दिलेल्या पत्रात आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.