महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । पुढचे दोन-चार दिवस सूर्यनारायणाच्या कोपाला सामोरं जाण्याची तयारी करुनच घराबाहेर पडा. कारण आजपासून पुढचे चार दिवस तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान विभागनं वर्तवली आहे. विदर्भाबरोबर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला देखील वाढत्या तापमानाची झळ बसणार आहे.