महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 3 एप्रिल । आयपीएल 2022 मधील (IPL 2022) 9 व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सचा 23 रननं पराभव केला. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडिअमवर झालेल्या मॅचमध्ये (MI vs RR) राजस्थाननं दिलेलं 194 रनचं आव्हान मुंबईला पेलवलं नाही. मुंबईनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 170 रन केले. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव आहे.
मुंबईचा मॅचमध्ये पराभव झाला असला तरी नवोदीत तिलक वर्मानं (Tilak Varma) अर्धशतक झळकावत सर्वाचं मन जिंकलं. त्यानं 33 बॉलमध्ये 3 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं 61 रन केले. तिलकच्या फटकेबाजीच्या दरम्यान मैदानात एक दुर्घटना घडली. मुंबई इंडियन्सच्या 12 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. राजस्थानकडून रियान पराग ती ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरमध्ये तिलकनं मारलेला सिक्स थेट कॅमेरामनच्या डोक्याला लागला.
तिलकनं संपूर्ण शक्तीनं मारलेला बॉल बाऊंड्री लाईनच्या जवळ उभ्या असलेल्या कॅमेरामनच्या डोक्याला लागला. अचानक डोक्याला लागलेल्या बॉलनं त्याला क्षणभर काहीच सुचलं नाही. त्यावेळी बाऊंड्रीवर उभा असलेला राजस्थान रॉयल्सचा फिल्डर ट्रेन्ट बोल्ट त्याच्याजवळ गेला. त्याने कॅमेरामनची विचारपूस केली. तसंच आयपीएल स्पर्धेसाठी काम करत असलेल्या मेडिकल टीमला तिथं बोलवले.
https://www.iplt20.com/video/41816/tilak-varmas-six-hits-on-field-cameraman#
या आयपीएलमध्ये खेळाडूंनी मारलेला सिक्स लागल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सच्या आयुष बदोनीनं मारलेला सिक्स एका महिला फॅनच्या डोक्याला लागला होता. तसंच मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स मॅचमध्येही रोहित शर्मानं मारलेल्या सिक्समुळे एक फॅन जखमी झाला होता.
मुंबईनं घालवली हातातील मॅच
शेवटच्या 7 ओव्हरमध्ये मुंबईला विजयासाठी 73 रनची गरज होती आणि 7 विकेट शिल्लक होत्या, पण अश्विनने तिलक वर्माची तर चहलने लागोपाठ दोन बॉलला टीम डेव्हिड आणि डॅनियल सॅम्स यांची विकेट घेतली आणि मुंबईच्या हातातून मॅच निसटली. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स पॉईंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे.