पिंपरी चिंचवडमध्ये धोका टळला नाही , आणखी 6 जणांना कोरोनाची लागण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; पिंपरी चिंचवड, 4 एप्रिल: पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना व्हायरसचा धोका कायम आहे. शनिवारी आणखी 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची लागण झालेले चारही जण निजामुद्दीन येथे मरकज येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. सध्या पिंपरीत एकूण कोरोना बाधितांची संख्या 9 असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

मिळालेली माहिती अशी की, तबलिगी जमाततील महाराष्ट्रात परत आलेल्यांमधील 11 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. दोन पुणे, सहा पिंपरी-चिंचवड, दोन अहमदनगर तर एक हिंगोलीत सापडला आहे. आतापर्यंत 738 जणांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रात एकूण 1033 लोकांशी संपर्क करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *