महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; पुणे : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. पुणे शहरात वाढता आकडा पाहता कोरोनाची साथही तिसऱ्या स्टेजच्या उंबरठ्यावर येऊन धडकली आहे. शनिवारी पुण्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला. ससून रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित संशयित महिलेचा मृत्यू झाला होता. परंतु, या महिलेचा रिपोर्ट हाती आला नव्हता. त्यामुळे ही महिला कोरोनाबाधित होती की नाही हे स्पष्ट झाले नव्हते. परंतु, आज या मयत झालेल्या महिलेचा रिपोर्ट आला असून तो पॉझिटिव्ह आढळला आहे.
या महिलेला श्वसनाचा ञास होत होता. त्यातच उपचारादरम्यान, या महिलेचा मृत्यू झाला. तर पुण्यात आणखी 2 कोरोना रुग्ण अत्यवस्थ आहे. या रुग्णांच्या प्रकृतीत सुधार आणण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहे. धक्कादायक म्हणजे, पुण्यात जे रुग्ण आढळत आहे, त्यांनी कोणताही परदेश दौरा केले नाही. कोणत्याची प्रवासाची प्रार्श्वभूमी नसलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाची साथ तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.