अमेरिकेसाठी एवढं करा, डोनाल्ड ट्रम्प यांची मोदीनां विनंती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; वॉशिंग्टन: भारत हा जगातील प्रमुख औषध उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामध्ये कोरोनाच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या hydroxychloroquine या गोळीचाही समावेश आहे. भारताने या औषधाची निर्यात बंद केल्याने साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात या गोळीसह औषधांचा तुटवडा जाणवत आहे.

कोरोना व्हायरसचे(COVID-19) सर्वाधिक रुग्ण असलेली अमेरिका सध्या संकटात सापडली. या पार्श्वभूमीवर शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना अमेरिकेला एक मदत करण्याची विनंती केली.

मात्र, आता भारताने अमेरिकेन कंपन्यांकडून देण्यात आलेली hydroxychloroquine गोळ्यांची ऑर्डर पूर्ण करावी, असे ट्रम्प यांनी मोदींना सांगितले. मोदींनी ट्रम्प यांची ही विनंती मान्य केल्याचे समजते. एवढेच नव्हे तर आपणदेखील या गोळीचे सेवन करणार असल्याचे ट्रम्प यांनी मोदींना सांगितले.
hydroxychloroquine या गोळीचा वापर सहसा मलेरियाच्या रुग्णांवरील उपचारासाठी केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांत कोरोनावर ही गोळी प्रभावी ठरत असल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे जगभरात या औषधाची मागणी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *