Gold Silver Price: सोने-चांदी नवे भाव जाहीर; जाणून घ्या आजचे भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ एप्रिल । सोने आणि चांदीचे दरांमध्ये चढउतार होत असतात. आज म्हणजेच 4 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,950 आहे, कालच्या दिवशी ही किंमत प्रतितोळा 47,950 रुपये होती.

२४ कॅरेट सोन्याच्या किमतीत किंचित घट-

देशात 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव आज 52,460 रुपये आहे. कालच्या दिवशी ही ही किंमत 52,480 रुपये होती. त्यामध्ये केवळ 20 रुपयांची घसरण दिसून आली. हे सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही-

चांदीच्या दराबद्दल बोलायचे झाले तर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज एक किलो चांदीचा दर 66,800 आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *