समाज कार्यात दादाची बेस्ट इनिंग या लोकांसाठी गांगुली ठरला ‘अन्नदाता’

Spread the love

महाराष्ट्र २४; ऑनलाईन ; बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने देखील कोलकत्तामधील इस्कॉनच्या केंद्राची मदत करत जवळपास 20 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. इस्कॉन कोलकत्ताचे प्रवक्ता आणि उपाध्यक्ष राधारमन दास म्हणाले की, आम्ही दररोज 10 हजार लोकांचे जेवण बनवायचो. मात्र सौरव गांगुली यांनी मदत केल्यानंतर आम्ही दररोज 20 हजार लोकांना जेवण देत आहोत.

दास म्हणाले की, मी दादाचा मोठा चाहता आहे आणि क्रिकेटच्या मैदानावर त्यांच्या अनेक इनिंग्स पाहिल्या आहेत. मात्र उपाशी लोकांनी जेवण देण्याची त्यांची ही पारी सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो.

https://twitter.com/SGanguly99/status/1246402653346607107

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *